पाकला भारताचा दणका : दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळणार

29 Mar 2019 10:57:48


नवी दिल्ली : दहशतवादाच्या मुद्द्यावर भारताने आणखी एक विजय मिळवला आहे. त्यामुळे चीनच्या मदतीने मसूद अजहरला पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच दणका मिळाला आहे. दीर्घ कालावधीनंतर भारताला दहशतवाद्यांना पुरवल्या जाणारी आर्थिक रसद रोखण्यासाठीचा प्रस्ताव भारताने संयुक्त राष्ट्रात मांडला आहे. यावरून भारताने पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

 

संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी सदस्य अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानचा उल्लेख करत चांगलेच सुनावले. "दहशतवादी पैसे गोळा करण्यासाठी नव्या कल्पना राबवत आहेत. मिळालेल्या पैशांतून दहशतवादी कारवाया घडवून आणून अनेक हकनाक बळी घेत आहेत. त्यांना पाठींबा देण्यासाठी काही देश पैसा पुरवत आहेत. अशा अनेक कारवायांमध्ये लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. संयुक्त राष्ट्रांनी याविरोधात पावले उचलली तर भारत यासाठी सहकार्याला तयार आहे", असे ते म्हणाले.

 

पाकवर काय परिणाम ?

या प्रस्तावावर सर्व देशांनी पाठींबा दर्शवल्यास दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यास मदत होणार आहे, तसेच जे देश दहशतवादी संघटनांच्या पाठीशी उभे राहतात त्यांच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या स्तरावर कारवाई केली जाणार आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात दहशतवादासंदर्भात अनेक पुरावे दिले आहेत. त्याद्वारे कारवाईची मागणीही केली जात आहे. 


एफएटीएफ फोर्सची नजर


दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या देशांवर आंतरराष्ट्रीय एक्शन टास्क फोर्स लक्ष्य ठेवून असते. आर्थिक गैरव्यवार आणि दहशतवादासाठी वापरल्या जाणाऱ्या पैशांविरोधात धोरण ठरवते. एफएटीएफ फोर्सने पाकिस्तानकडून बऱ्याचवेळा दहशतवादाविरोधातील फंडींसाठी आश्वासने मिळाल्याचे सांगितले आहे. मात्र, भारताना आता पाकिस्तानला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0