विकोचा गुणवत्ता आणि नाविन्यावर भर : पेंढरकर

26 Mar 2019 13:12:00



मुंबई : विको लॅबोरेटरीजच्या प्रवासातील या पुढच्या टप्प्यावर आम्ही उत्सुक आहोत आणि आमचे लक्ष आमच्या मूलभूत संकल्पांवर आहे. आम्ही नेहमीच गुणवत्ता आणि नाविन्य यावर भर दिला आहे. ही जाहिरात केवळ उत्पादनासंबंधी नसून विकोच्या रगारगात भिनलेल्या मूलभूत मूल्यांबाबत आमची वचनबद्धता, ती अधिक बळकटपणे व्यक्त करते़,” असे विको लॅबोरेटरीज संचालक संजीव पेंढरकर यांनी सांगितले.

 

विको उद्योग समूहाने नुकतेच आपल्या नव्या जाहिरात उपक्रमाच्या पदार्पणाची घोषणा केली. या उपक्रमात अभिनेत्री मिष्टी चक्रवर्तीचा समावेश आहे. ही जाहिरात मोहिम, चिकित्सेवर आणि बरे करण्यावर भर देणार्‍या दोन कार्यपद्धती अचूकपणे प्रस्तुत करते, ज्यातून ग्राहकाचे तजेलदार आणि चिरतरुण शरीरप्रतित होते आणि त्याबरोबरच त्वचेच्या सामान्य समस्यांचा इलाजदेखील सापडतो, असे कंपनीने म्हटले आहे.

 

तुमचा खुलुन दिसणारा चेहराया बिरुदास पात्र ठरण्यासाठी हा एक परवडण्याजोगा उपाय आहे. थोडक्यात सांगायचे झाले, तर हा दोन क्रांतिकारक उत्पादनांचा संच आहे जी परस्परपूरक तत्त्वांवर काम करत एकत्रपणे प्रभावी संगम साधतात आणि दोन्ही मिळून अत्यंत गुणकारी ठरतात, असेही संजीव पेंढरकर म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0