शरद पवार देशातील सर्वात भ्रष्ट नेता?

26 Mar 2019 17:47:01

पवारांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड करून केले बदल

 

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचा रंग चांगलाच वाढला आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणे यंदाच्याही निवडणुकीत सोशल मीडियाचा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे. सोशल मीडियाचा प्रचारासाठी जसा प्रभावी वापर होत आहे, तसाच याचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणात होत आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे शरद पवार. शरद पवार यांच्या विकिपीडियाच्या प्रोफाईलसोबत छेडछाड झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छेडछाड करून शरद पवार देशातील सर्वात भ्रष्ट नेता असा उल्लेख करण्यात आला आहे.
 

छेडछाड करून पवार यांची प्रोफाइल सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. अवघ्या २४ तासांच्या आत पवार यांच्या प्रोफाईलमध्ये तब्बल तीन वेळा बदल करण्यात आले. पवार हे देशातले सर्वात भ्रष्ट नेते आहेत असा उल्लेख केल्यानंतर ते देशातील सर्वात इमानदार नेते असल्याचे अपडेट करण्यात आले. यानंतर भारतातील सर्वात प्रसिद्ध नेता असेही अपडेट करण्यात आले. छेडछाडी नंतर त्यांच्या प्रोफाइलमध्ये दुरुस्ती करण्यात आली असली तरी छेडछाड केलेली त्यांची प्रोफाईल चांगलीच व्हायरल होत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0