पालघर निवडणुकीत महायुतीला बहुमत; नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे

    दिनांक  25-Mar-2019



पालघर : पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणूकीत भाजप-शिवसेना युतीला बहुमत मिळाले असले तरी नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे यांनी विजय मिळविला आहे. पालघर नगरपरिषदेच्या १४ प्रभागांमधील २८ जागांसाठी रविवारी ६७ टक्के मतदान झाले. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी तसेच अपक्ष असे तब्बल ९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

 

पालघर नगरपरिषदेचा जाहीर झालेल्या निकानुसार, महायुतीला १९, महाआघाडीला २ आणि अपक्ष ५ जागांवर विजयी झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेतर्फे राष्ट्रवादीतून आलेल्या श्वेता मकरंद पाटील, राष्ट्रवादीच्या उज्ज्वला केदार काळे आणि शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या अपक्ष उमेदवार अंजली पाटील रिंगणात होत्या. राष्ट्रवादी-काँग्रेस महाआघाडीच्या उज्ज्वला काळे यांनी १०६९ मतांनी विजय मिळवला. पालघर जिह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते. शिवसेना-भाजप-रिपाइं महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगला.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat