'या' नेत्याने भर सभेत लावले पाकिस्तान जिंदाबादचे नारे!

25 Mar 2019 12:52:40


 


नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात


जम्मू : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मोहम्मद अकबर लोन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावल्याचे त्यांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. शनिवारी कुपवाडा येथे झालेल्या सभेत त्यांनी हे नारे लावले आहेत. तर रविवारी अनंतनाग येथे झालेल्या सभेत त्यांनी पाकिस्तानला एक शिवी दिलीत तर मी दहा शिव्या देईन असे वादग्रस्त विधानही केले आहे.

 

लोकसभेचे बिगुल वाजल्याने देशभरातील सर्वच नेते फॉर्ममध्ये आहेत. मोहम्मद अकबर लोन हे नॅशनल कॉन्फरन्सचे कुपवाडा लोकसभेचे उमेदवार आहेत. आपल्या प्रचार सभेवेळी बोलताना ते म्हणाले, "शेजारील मुस्लिम देश नेहमी यशस्वी राहो, आपली आणि त्यांची मैत्री वाढत राहो. भारत आणि पाकिस्तानची मैत्री कायम राहो. या दोन्ही देशांच्या मैत्रीचा मी चाहता आहे. म्हणूनच जर पाकिस्तानविरुद्ध कोणी एक घोषणा दिली तर मी पाकिस्तान जिंदाबादच्या दहा घोषणा देईन."

 

लोन यांच्या या वादग्रस्त विधानानंतर चांगलेच राजकारण पेटले असून सोशल मीडियामध्ये लोन ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर स्थानिक भाजप नेत्यांनी लोन यांच्यावर उमर अब्दुल्ला यांनी लोन यांच्यावर पक्षांतर्गत कठोर कारवाई करवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0