नाशिक जव्हार रोडवर बसचा भीषण अपघात

24 Mar 2019 16:25:16



पालघर : पालघर जिल्ह्याच्या मोखाडामध्ये बसचा भीषण अपघात झाला आहे. तोरंगणा घाटात पालघरला येत असताना खाजगी बस २५ फुट दरीत कोसळली आहे. मोखाडा-त्र्यंबकेश्वर रोडवर बस दरीत कोसळली असल्याची माहिती देण्यात आली आहे. या बसमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर बस अपघातामध्ये तब्बल ४५ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 

जखमींना तात्काळ त्र्यंबकेश्वरमध्ये नजिकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सुरक्षा दल आणि पालघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर अपघातग्रस्तींना मदत करण्याचं काम सध्या सुरू आहे. दरीत कोसळलेली बस सध्या बाहेर काढण्याचं काम सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0