दिव्यांगांसाठी पीडब्ल्यूडी मोबाइल ॲप

23 Mar 2019 16:32:51



राज्यातील २ लाख २४ हजार दिव्यांग मतदारांना होणार फायदा

 

मुंबई : निवणूक आयोगाने दिव्यांगांसाठी विशेष ॲप उपलब्ध करून दिले आहे. यामुळे राज्यातील दिव्यांग मतदारांची यंदाची लोकसभा निवडणूक अधिक सुलभ होणार आहे. निवडणूक आयोगाने यंदा दिव्यांग मतदारांसाठी सुलभ निवडणुकाहे घोषवाक्य घोषित केले आहे. त्यानुसार दिव्यांग मतदारांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.

 

दिव्यांगांना मतदानासाठी निवडणूक आयोगाने पीडब्ल्यूडी (PWD) हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. दिव्यांगांची मतदारनोंदणी, मतदान केंद्राचा शोध, व्हीलचेअरची मागणी इत्यादी सोयी यावर उपलब्ध करता येणार आहेत. यासोबतच दिव्यांग मतदारांना प्रशासनामार्फत मतदान केंद्रापर्यंत मोफत वाहतूक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यात यंदा दिव्यांग मतदारांची संख्या २ लाख २४ हजार १६२ इतकी असून त्यांचा या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

 

निवडणूक आयोगातर्फे यंदा दिव्यांग मतदारांची विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात आली. याचबरोबर मतदान केंद्रांवर दिव्यांगांना रांगेशिवाय प्रवेश, संख्या अधिक असल्यास दिव्यांगांसाठी स्वतंत्र रांग, रॅम्प सुविधा, अधिक प्रकाश व्यवस्था, व्हील चेअर जाऊ शकेल असा मोठा दरवाजा, दिव्यांगांसाठी स्वतंत्र पार्किंग आदी सुविधा असणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0