पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्याला अटक

22 Mar 2019 14:04:19



नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यातील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. सज्जाद पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड मुदस्सीरचा निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे.

सज्जाद खान हा दिल्लीत शाल विकण्याचे काम करतो. गुरुवारी रात्री दिल्ली पोलिसांना त्याची माहिती मिळाल्यानंतर सज्जाद खान याला लाल किल्ला परिसरातून गुरुवारी अटक केली. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी सज्जादची कसून चौकशी करत आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सज्जाद खान हा पुलवामा हल्यार चा मास्टरमाईंड मुदस्सीरच्या संपर्कात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

 

मुदस्सिर अहमद खान, याचा सुरक्षा दलाने ११ मार्च रोजी त्राल येथील चकमकीत खात्मा केला होता. मुदस्सिर हा पुलवामातील त्रालच्या मिर मोहल्ल्यात राहत होता. २०१७ मध्ये तो जैश-एमोहम्मदमध्ये दाखल झाला होता. पुलवामातील १४ फेब्रुवारी रोजी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या हल्यासाठी वापरलेल्याप गाडीची आणि स्फोटकांची जमवाजमव केली होती.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0