अक्षय कुमारच्या 'केसरी'ला पायरसीचे ग्रहण

22 Mar 2019 16:58:34



मुंबई : दिवसेंदिवस चित्रपट सृष्टीला पायरसीचा राक्षस पोखरत चालला आहे. यापासून अक्षयकुमारचा 'केसरी'सुद्धा वाचू शकला नाही. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासातच 'तामिल रॉकर्स' या वेबसाइटवर लीक झाला आहे. त्यामुळे बॉक्सऑफिसवर या चित्रपटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

 

सारागढीच्या युद्धाची गाथा सांगणारा आणि अभिनेता अक्षय कुमारची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'केसरी' या चित्रपटाला सध्या समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या सुट्टीच्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला पहिल्या दिवसापासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 

'केसरी' प्रदर्शित झाल्यावर काही तासांतच त्याची पायरेटेड प्रिंट तामिल रॉकर्सवरच्या वेबसाइटवर व्हायरल झाली. याआधीसुद्धा गली बॉय, मणिकर्णिका, सिम्बा, टोटल धमाल असे अनेक चित्रपट 'तमिलरॉकर्स' या वेबसाईटवर लीक झाले होते. दक्षिण भारतातले अनेक निर्माते 'तामिल रॉकर्स' विरोधात न्यायालयात गेले आहेत. याआधीही रजनीकांतचा '२.०' हा चित्रपट लीक झाला होता. त्यानंतर चित्रपट निर्मात्याने मद्रास उच्च न्यायालयात दाद मागितली होती.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0