प्रियांका गांधींनी केला लाल बहादूर शास्त्रींचा अपमान!

21 Mar 2019 15:43:16




नवी दिल्ली
: प्रियांका गांधींनी लाल बहादूर शास्त्रींचा अपमान केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला आहे. स्मृती इराणी यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओमध्ये कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी त्यांच्या गळ्यातील माळ उतरवून लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला घालत आहेत. हा या महापुरुषाचा अपमान असल्याची टीका स्मृती इराणी यांनी केली आहे.




कॉंग्रेसवर कडाडत त्यांनी विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस पक्ष त्यांचे संस्कार जगासमोर दाखवत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. विविध ठिकाणी जाऊन त्या प्रचार करत आहेत. त्यावेळच्या या व्हिडिओमुळे प्रियांका गांधी अडचणीत आल्या आहेत. यावरून भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर टीका केली आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0