पहिल्या दिवशी 'केसरी'ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद

21 Mar 2019 20:35:45


 


मुंबई : अक्षयकुमारचा बहुचर्चित 'केसरी' चित्रपट गुरुवारी प्रदर्शित झाला. धुळवडीचा कालावधी असतानादेखील चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांसोबतच परीक्षकांच्याही पसंतीस पडत आहे. ३६ व्या शीख रेजिमेंटचे २१ सैनिक आणि १० हजार अफगाण सैनिकांमध्ये झालेल्या सारागढीच्या अभूतपूर्व युदधावर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाच्या सर्वच बाबींमध्ये प्रेक्षकांची वाहवाही मिळवली आहे. होळी आणि धूळवडीचा सण असूनदेखील प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगलीच गर्दी केली होती.

 

अनुराग सिंग यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून अक्षय कुमार आणि परिणीती चोप्राची यात प्रमुख भूमिका आहे. सारागढीची लढाई ही भारतीय इतिहासातील आतापर्यंतची लढलेली सर्वात धाडसी लढाई मानली जाते. ३६व्या शीख रेजिमेंटच्या २१ वीरांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत लढा दिला. या २१ शूरवीरांची अविश्वसनीय शौर्य गाथा ‘केसरी’ या चित्रपटामध्ये मांडली आहे. अक्षय कुमार समवेत यामधील प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका चांगल्याप्रकारे वठवली आहे. तसेच, दिग्दर्शन, पटकथा आणि लेखन यामध्येदेखील हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0