अर्नाळा समुद्रात बुडून पाच जणांचा मृत्यू

21 Mar 2019 21:26:36



वसई : धुळवड साजरी करण्यासाठी वसईतील अर्नाळा समुद्र किनारी गेलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. दरम्यान घटनास्थळी पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी दाखल झाले आहेत.

 

भारतीय तटरक्षक दलाची मदत घेण्यात आली, अशी माहिती माहिती पालघरच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेले सर्व जण वसई पश्चिमेकडील गोकुल पार्क या सोसायटीतील राहणारे आहेत.

 

गोकुळ पार्क, मानव मंदिर- स्वामी नारायण मंदिर, अंबाडी रोड वसई पश्चिम येथील सर्वजण राहणारे असून निशा कमलेश मौर्या (वय ३६) , प्रशांत कमलेश मौर्य (वय १७, प्रिया कमलेश मौर्य (वय १९), कंचन मुकेश गुप्ता (वय ३५) , शितल दिनेश गुप्ता (वय ३२), अशी त्यांची नावे आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat




Powered By Sangraha 9.0