ईडीची मोठी कारवाई; सात अतिरेक्यांच्या संपत्ती जप्त

21 Mar 2019 12:37:41




हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दिन करत होता टेरर फंडिंग

 

जम्मू काश्मीर : अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने काश्मीर खोर्‍यात मोठी कारवाई केली आहे. दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातून निधी मिळाल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाउद्दिन व अन्य सहा जणांच्या संपत्तीवर टाच आणल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली. काश्मिरी खोऱ्यात एकूण १३ ठिकाणी छापे टाकून १.२२ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

 

सय्यद सलाउद्दिन हा पाकिस्तानमध्ये लपून बसला असून तेथूनच तो हिजबुलचे काम पाहतो. काश्मिरी खोऱ्यात दहशतवादी कारवायांसाठी जम्मू-काश्मीर अफेक्टीज रीलिफ ट्रस्टच्या आडून तो पैसे पुरवत असतो. याच पैशातून त्याने काश्मिरी खोऱ्यात अनेक ठिकाणी संपत्ती घेऊन ठेवली होती. या संपत्ती हिजबुलचा अतिरेकी मोहम्मद शफी शहा आणि अन्य सहा अतिरेक्यांच्या नावावर आहेत. दरम्यान, सलहुद्दीन यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर शाह आणि इतरांना बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कलमाअंतर्गत (यूएपीए) अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0