बेलापूरमध्ये १० टन प्लास्टिक, थर्माकोल जप्त

21 Mar 2019 14:32:40



नवी मुंबई : बेलापूरमध्ये प्लास्टिक, थर्माकोलची जप्ती करण्यात आली आहे. बुधवारी बेलापूर सेक्टर वीस मधील एका बंद इमारती साठवून ठवलेला १० टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. जप्त केलेले प्लास्टिक गुजरात राजकोट येथून मागवण्यात आले होते. अशाप्रकारे एकाच ठिकाणाहून प्लास्टिक व थर्माकोल जप्तीची ही राज्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

 

अली एंटरप्रायझेस या नावाने साठा करणा-या व्यावसायिकावर एन.आर.आय. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अली एंटरप्रायझेस नावाने कंपनी चालविणा-या व्यक्तीने बेलापूर सेक्टर वीस येथील एका बंद इमारतीत अनधिकृत गोडाऊन तयार केले होते. रात्रीच्या सुमारास येथे माल उतरविला जात होता. त्यामुळे येथे अनधिकृत गोडाऊन असल्याची कोणालाही माहिती नव्हती. अखेर माहिती मिळाल्यानंतर महापालिकेने ही कारवाई केली.

 

होळी व धुलीवंदन सणांच्या पार्श्वभूमीवर अशाचप्रकारची कारवाई परिमंडळ १ क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी व तुर्भे येथे करण्यात आली आहे. यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणा-या ३५ दुकानदारांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १ लाख ६८ हजार इतकी मोठ्या प्रमाणात दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली असून दुकानदारांकडून ५३५ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0