या देशात शब्दांचा अर्थ बदलण्याची ताकद

02 Mar 2019 12:58:31


 


नवी दिल्ली : "भारतामध्ये एवढी ताकद आहे की, तो शब्दकोशातील शब्दांचा अर्थ बदलू शकतो. शूरवीर विंग कमांडर अभिनंदन यांनी 'अभिनंदन'ची व्याख्याच बदलून टाकली आहे. त्यांचे साहस आणि शौर्यतेची प्रशंसा देशभरात केली जात आहे." अशी प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. ते विज्ञान भवन येथे आयोजित 'कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी ऑफ इंडिया २०१९' या कार्यक्रमात बोलत होते.

 

पंतप्रधान पुढे म्हणाले की, "देश आता एक पराक्रमी राष्ट्र म्हणून पुढे सरसावत आहे. भारताच्या प्रत्येक गोष्टींकडे आता सर्व जगाचे लक्ष आहे. पहिले 'अभिनंदन' या शब्दाचा अर्थ 'काँग्रॅच्युलेशन्स' असा होता. मात्र आता आता याचा अर्थ बदलला जाईल." विंग कमांडर अभिनंदन यांची शुक्रवारी पाकिस्तानच्या कैदेतून सुटका करण्यात आली. शुक्रवारी रात्री अटारी बॉर्डरवर पाकिस्तानमधून भारतमध्ये त्यांनी प्रवेश केला.

 

पंतप्रधान यांनी कार्यक्रमात स्वस्त गृहनिर्माण कार्यक्रमाचीदेखील माहिती दिली. ते म्हणाले की," बांधकाम व्यवसायात आपल्या विचारांमध्ये अनेक सकारात्मक बदल केले आहेत. घर असो, बंगले असो, व्यावसायिक इमारत असो किंवा रस्ते असो, त्यांना इको फ्रेंडली बनवण्यासाठी आपण काम केले आहे. तसेच, परवडणाऱ्या घरांवरील जिएसटीला कमी करून ८ टक्क्यांवरून १ टक्क्यावर आणले आहे."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0