जांबाज पोलीस अधिकारी सुरज गुरव पुन्हा एकदा चर्चेत

02 Mar 2019 16:33:24


 


महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिका-यांना 'गृहमंत्री पदक'


नवी दिल्ली : महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिका-यांना गुन्हे अन्वेषणातील गुणवत्तेसाठी गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी २५ राज्य, केंद्रशासित प्रदेश व केंद्रीय तपास यंत्रणेत कार्यरत असणा-या १०१ पोलीस अधिका-यांना गृहमंत्री पदक जाहीर केले. यात महाराष्ट्रातील ११ पोलीसांचा समावेश आहे.

 

यात सुरज गुरव हे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. कोल्हापूर महापालिका महापौर निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे आमदार व माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना सडेतोड उत्तर दिले होते. वर्दीवर येण्याची गरज नाही. एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी करतो. असे ठोकपणे मुश्रीफ यांना उत्तर दिले होते. गुरव हे कोल्हापूर पोलीस दलात उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर कार्यरत आहेत.

 

महाराष्ट्रातील गृहमंत्री पदकाचे विजेते

 

राज तिलक रोशन (पोलिस उपायुक्त), दिपक पुंडलिक देवराज (पोलिस उपायुक्त), सुरज पांडुरंग गुरव (पोलिस उपाधिक्षक), रमेश नागनाथ चोपडे (सहाय्यक पोलिस आयुक्त), दिनेश विठ्ठलराव आहेर (पोलिस निरीक्षक), शशिराज गुंडोपंत पाटोळे ( पोलिस निरीक्षक), चिमाजी जगन्नााथ आढाव (पोलिस निरीक्षक), सुरज जयवंत पडावी (पोलिस निरीक्षक), सुनिल किसन धनावडे (पोलिस निरीक्षक), सचिन मुरारी कदम (पोलिस निरीक्षक) आणि धनंजय चित्तधरंजन पोरे (सहाय्यक पोलिस निरीक्षक) यांचा समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0