अनिल अंबांनींनी फेडली एरिक्सनची थकबाकी

18 Mar 2019 19:33:03



नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीपूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन्सने स्वीडन टेलिकॉम इक्विपमेंट मेकर एरिक्सनला ४५८.७७ कोटी रुपयांची थकबाकी दिली आहे. यामुळे आरकॉमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची अटक टळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अंबानी यांना १९ मार्चपर्यंतची मुदत दिली होती.

 

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या आरकॉमने स्वीडन कंपनीची थकबाकी रखडवल्याप्रकरणी वर्षभरापासून न्यायालयात खटला सुरू आहे. थकीत रकमेचा परतावा न केल्यास अंबानी यांना तीन महिन्यांसाठी तुरुंगात जावे लागले असते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एरिक्सनला ४५८.७ कोटींची थकबाकी दिली आहे. या प्रकरणी एरिक्सनकडून कोणतिही प्रतिक्रीया आलेली नाही. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयात अंबानी यांना या थकबाकीप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते.


 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 

Powered By Sangraha 9.0