ट्री मदर चा राष्ट्रपतींना आशीर्वाद

16 Mar 2019 23:38:41

 

 
 
 
नवी दिल्ली : शनिवारी नवी दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवनाता २०१८ च्या पद्म पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्म पुरस्कार देण्यात आले. १०८ वर्षांच्या सालूमरदा थिमाक्का यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपतींच्या डोक्याला हात लावून त्यांना आशिर्वाद दिला. आजवर झालेल्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये प्रथमच असे घडले.
 
 
 
 

थिमाक्का यांनी आशिर्वाद दिल्याने या सोहळ्याला उपस्थित असलेले सर्व दिग्गज, पंतप्रधान, राष्ट्रपती आणि इतर उपस्तित मान्यवरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले आणि टाळ्यांच्या कडकडाटाचा आवाज सभागृहात दुमदुमला. सालूमरदा थिमाक्का यांना वृक्ष माता असे म्हटले जाते. थिमाक्का यांनी आजवर ८००० पेक्षा अधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन केले आहे. थिमाक्का यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची संधी मला मिळाली आणि त्यांच आशिर्वाद मला लाभले. असे म्हणत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0