मसूदला फ्रान्सकडून धक्का : संपत्ती जप्त होणार

15 Mar 2019 15:34:53


नवी दिल्ली : 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरच्या मुसक्या आवळण्यासाठी आता फ्रान्सने पुढाकार घेतला आहे. संयुक्त राष्ट्रात मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने खोडा घातल्यानंतर आता फ्रान्सने मसूदला पहिला दणका दिला आहे. फ्रान्सने आता मसूदची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

चीनने व्हिटोचा वापर केल्यानंतर फ्रान्सने अजहरची संपत्ती जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. जैशविरोधात फ्रान्स सरकारची ही आत्तापर्यंतची मोठी कारवाई आहे. मसूदच्या बाजूने चीनने व्हिटोचा वापर केल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांनी चीनला इशारा दिला होता.

 

मसूद अजहरचे नाव युरोपीय संघाने तयार केलेल्या दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात येईल, असे फ्रान्स सरकारच्या गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले तर, दुसरीकडे दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई करण्याबाबत जागतिक दबाव वाढल्याने पाकची पूर्णतः कोंडी होत आहे.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0