न्यूझीलंडमध्ये मशिदीत अंदाधुंद गोळीबार ; ४० जणांचा मृत्यू

15 Mar 2019 11:38:32


 

 

ख्राइस्तचर्च : न्यूझीलंडमधील ख्राइस्तचर्च येथे एका मशिदीमध्ये अज्ञात इसमाने अंदाधुंद गोळीबार सुरु केला. यामध्ये आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. न्यूझीलंडच्या प्रमाणवेळेनुसार दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी हा सर्व प्रकार घडला.

 

बांगलादेशचा क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. बांगलादेशच्या संघाचा न्यूझीलंड दौऱ्यातील शेवटचा तिसरा कसोटी सामना १६ मार्चपासून ख्राइस्तचर्च येथे सुरू होणार आहे. त्याआधी बांगलादेशचा संघ शहरातील मशिदीत गेला होता. यावेळी अज्ञात इसमाने मशिदीवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात बांगलादेशचा संघ सुखरुप बचावला आहे.

 

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ता जलाल युनुस म्हणाले, गोळीबाराच्या वेळेस संघातील सदस्य मशिदीच्या आतमध्ये होते. खेळाडू आता सुखरुप आहेत. परंतु, त्यांना मानसिक धक्का बसला आहे. आम्ही त्यांना हॉटेलमध्येच सुखरुपरित्या राहण्यास सांगितले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0