सुशीलकुमार शिंदेंना सोलापूरातून उमेदवारी

    दिनांक  14-Mar-2019


सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदार संघातून लोकसभा लढवणार आहेत. २०१४ च्या लोकसभेवेळी केंद्रीय गृहमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदेंचा परभाव करत भाजपच्या शदर बनसोडे यांनी विजय मिळवला होता.

या लोकसभा निवडणूकीत शिंदे यांनी नव्याने सुरुवात केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान खासदार शरद बनसोडे यांनी शिंदे यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. सुशिलकुमार शिंदेंच्या उमेदवारीनंतर आता शिंदेंविरोधात कोण उमेदवार असेल याकडे राजकीय वर्तूळाचे लक्ष आहे.


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat