वाढदिवसानिमित्त आमीरकडून चाहत्यांना खास भेट!

    दिनांक  14-Mar-2019

 

 
 
 
 
मुंबई : अभिनेता आमीर खानचा आज ५४ वा वाढदिवस! बॉलिवुडचा हा मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या कामाप्रती किती प्रामाणिक आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आमीर खानने पत्नी किरण रावसोबत केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. सेलिब्रेशनच्या वेळी आमीरने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा केली.
 

 
 

‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवुडपटाच्या हिंदी रिमेकमध्ये आमीर काम करणार आहे. ‘लाल सिंह चढ्ढा’ असे या सिनेमाचे नाव असून हा एक विनोदी सिनेमा असेल. आपल्या या आगामी प्रोजेक्टसाठी आमीर खान २० किलो वजन घटवणार आहे. तसेच या व्यक्तिरेखेसाठी तो सहा महिने मेहनत घेणार आहे. दिग्दर्शक अद्वैत चंदन या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून त्यांनी यापूर्वी आमीरच्या ‘सिक्रेट सुपरस्टार’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. त्यामुळे आता लाल सिंह चढ्ढा या सिनेमाकडून आमीरच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

 
  
 

दरम्यान, माझ्या प्रिय मित्रा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! ए क्या बोलता तू?” असे म्हणत माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आपल्या मिश्किल अंदाजात आमिरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर आमीरचा मुलगा आजादने स्वत: काढलेली अनेक चित्रे फ्रेम करून भेट दिली.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat