अजिंक्य राहणे म्हणतोय, "थँक यू शेतकरी दादा..."!

13 Mar 2019 12:57:06



मुंबई : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अंजिक्य राहणे याने शेतकऱ्यांप्रती आपले ऋण व्यक्त केले आहेत. मी शेतकरी कुटुंबातील असल्याने माझ्या मनात शेतकऱ्यांविषयी खूप आदर असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करत त्याने शेतकऱ्यांचे आभार मानले आहेत.

 

शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन रहाणेने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. यात एक शेतकरी असून त्या शेतकऱ्याच्या योगदानाबद्दल तो त्याचे आभार मानतो. रहाणेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ''आज आपल्याला जे काही मिळतं ते सर्व शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे मिळते. त्यामुळे आपल्या जीवनातील त्यांचे योगादान फार महत्त्वाचे आहे. आपल्या ताटातील अन्न मिळण्यामागे एका शेतकऱ्याची मेहनत असते याचा विसर पडू देऊ नका."

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0