वाघा बॉर्डरवर उत्सूकता 'वाघा'ला भेटण्याची

01 Mar 2019 17:04:32
 
 

चंदीगढ : भारताचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे अटारी बॉर्डरवर दाखल झाले आहेत. कोणत्याही क्षणी पाकिस्तान त्यांना भारताकडे सोपवेल.

 

 
 
दरम्यान भारतीय वायुसेनेच्या विमानाने अभिनंदन भारतात यावेत, अशी मागणी भारत सरकारने केली होती. मात्र, पाकिस्तानने ही मागणी फेटाळली.
 
 
 
 
 
विंग कमांडर अटारी बॉर्डरवरूनच यावेत, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली. भारताने एका विशेष विमानाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे. अभिनंदन यांच्या व्यवस्थेसाठी एका रुग्णवाहीकेची सोय करण्यात आली आहे.
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0