'जैश'चा मसूद अझहर पाकिस्तानातच

01 Mar 2019 15:00:55


नवी दिल्ली : जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर पाकिस्तानातच असल्याची कबुली पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी दिली आहे. "मसूद पाकिस्तानातच असून तो खूप आजारी असल्याचे समजले आहे. माझ्या माहितीनुसार, तो आजारपणामुळे घरातूनही बाहेर पडत नाही. भारताने त्याच्याविरोधात सबळ पुरावे दिल्यास त्याच्यावर कारवाई करू." असे कुरेशी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

 

"मसूद अझहर पाकिस्तानातच आहे. भारताने त्याच्याविरोधात सबळ पुरावे दिल्यास पाक सरकारकडून त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. भारताने दिलेले पुरावे पाकिस्तानच्या न्यायालयात टिकले आणि मान्य करण्यात आले, तर मसूदवर कारवाई होईल. भारताने दिलेल्या पुराव्यांची शहानिशा केली जाईल. हे पुरावे 'खोडून काढता न येण्याइतके भक्कम' असतील, तर आम्ही पाकिस्तानच्या न्यायालयाला तसे पटवून देऊ." असे कुरेशी यांनी मुलाखतीत सांगितले आहे. दशतवादाला खतपाणी घालण्याचे आणि भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे कारस्थान करणारा पाकिस्तान वरवर दहशतवादाविरोधात कारवाई करण्यास उत्सुक असल्याचे भासवत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0