निनाद मांडवगणे अनंतात विलीन

    दिनांक  01-Mar-2019


 


नाशिक : जम्मू-काश्मीर येथे वीरमरण प्राप्त झालेले स्कॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निनाद यांच्या वडिलांनी त्यांना मुखाग्नी दिला. अंत्ययात्रेमध्ये नाशिककरांच्यासह अनेक नागरिक सहभागी झाले होते.

 

अंत्ययात्रेमध्ये 'भारत माता की जय', 'पाकिस्तान मुर्दाबाद', 'शहीद जवान निनाद अमर रहे' अशा घोषणा देण्यात आल्या. वीरपत्नी विजेता आणि त्यांच्या चिमुकल्याकडे बघून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. परिसरात सर्वत्र शोकाकूल वातावरण होते. निनाद मांडवगणे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ठिकठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

 

"युद्ध काय असते तुम्हाला माहित नाही, आम्हाला युद्ध नकोय, युद्धात काय नुकसान होतं, हे तुम्हाला माहित नाही. आणखी निनाद जाता कामा नये." अशीही भावना त्यांनी बोलताना व्यक्त केली. "निनाद हा माझ्या आयुष्याचा भाग होता, राहणार आणि कायम आहे. आज आमच्या घरातून जवान गेला, उद्या दुसऱ्या कुणाच्या घरातून जवान जाईल. पण, फेसबुकवरील योद्ध्यांना माझी एक विनंती आहे, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांनो हे बंद करा. यातून काही होणार नाही. तुम्हाला खरंच काय करायचे असेल तर सैन्यात सामील व्हा आणि मग खरा अनुभव घ्या." असा सल्ला हुतात्मा स्कॉर्डन लिडर निनाद मांडवगणे यांच्या वीरपत्नीने दिला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat