भारताचा योद्धा 'अभिनंदन' मायदेशी परतणार

01 Mar 2019 11:32:21


 

 

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारतीय हवाई दलाचे जवान अभिनंदन वर्थमान आज मायदेशात परतणार आहेत. याबद्दलची घोषणा पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी पाकिस्तानच्या संसदेत केली. भारतीय वैमानिकास पाकिस्तानने तत्काळ मुक्त करावे. मात्र, त्यासाठी भारत कोणत्याही प्रकारचा तह पाकिस्तानशी करणार नाही, असा सूचक इशारा भारताने दिल्यानंतर पाकिस्तानला नमावे लागले.

 

विंग कमांडर अभिनंदन वर्थमानच्या आगमनासाठी अटारी - वाघा सीमा सज्ज आहे. तसेच, स्थानिकांकडून स्वागताची तयारी केली गेली आहे. बुधवारी पाकिस्तानने हवाई हद्दीचे उल्लंघन केले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईला घाबरून पाकिस्तानच्या वायुदलाने पळ काढला होता. कारवाईदरम्यान भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान जमिनदोस्त केले. तर, भारतालाही आपला एक विमान गमवावा लागला. हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत कोसळल्यामुळे विमानाचे चालक अभिनंदन वर्थमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0