शिवशाही एसी स्लीपरच्या तिकीट दरात कपात

09 Feb 2019 14:02:22



 

वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा; महामंडळाचे आवाहन

 

मुंबई : एस.टी महामंडळ वातानुकुलित शिवशाही शयनयान (AC Sleeper) बसच्या तिकीट दरांमध्ये भरघोस कपात करण्यात आली आहे. भाडेदरात कमीत कमी २३० ते ५०५ रूपये कपात करण्यात आली. राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, खाजगी वाहतुकीची स्पर्धा तसेच लांब पल्ल्याचा प्रवास ज्येष्ठ नागरिकांना सुखकर व माफक दरात व्हावा या उद्देशाने ही दर कपात करण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर ही कपात करण्यात आली. कमी झालेले नवीन दर १३ फेब्रुवारीपासून लागू करण्यात येत आहेत.

 

वातानुकूलित शिवशाही शयनयान बसचा वापर करावा; महामंडळाचे आवाहन

 

एस.टी महामंडळाने शिवशाही शयनयान बसच्या तिकीट दरात कपात करण्याचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवला होता. सध्या, एस.टी. महामंडळातर्फे राज्यातील विविध ४२ मार्गावर वातानुकूलित शिवशाही बस धावत आहेत. कमी झालेल्या तिकीट दरांमुळे खाजगी प्रवासी वाहतुकीशी सक्षमपणे स्पर्धा करीत जास्तीत जास्त प्रवासी वाढवण्याचे उद्दिष्ट एस.टी महामंडळाने ठेवले असून प्रवाशांच्या मागणीनुसार भविष्यात आणखी नवीन मार्गावर शयनयान बस सुरु करण्याची तयारी ठेवली आहे. वातानुकूलित शिवशाही शयनयान बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरामध्ये ३० टक्के सवलत यापूर्वीच देण्यात आली आहे. त्यामुळे तिकीट दरातील कपातीचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांनाही होणार असल्यामुळे प्रवाशांनी सुरक्षित आरामदायी व किफायतशीर शयनयान प्रवासासाठी, असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0