महाराष्ट्राला भरली हुडहुडी

09 Feb 2019 17:01:57



मुंबई : फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीचा अनुभव राज्यासह मुंबईमध्येही घेता येत आहे. थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीची हुडहुडी अनुभवायला मिळली आहे. मुंबईत शुक्रवारी गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा ६ अंशांनी घसरला आहे. शुक्रवारी सांताक्रूझमध्ये १४.४ तापामानाची नोंद झाली. मुंबईतील शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा २४ अंश सेल्सियसपर्यंत खाली गेल्याने मागील दहा वर्षातल्या सर्वात कमी कमाल तापमानची नोंद करण्यात आली आहे.

 

महाबळेश्वरमध्येही पारा कमालीचा घटला असल्याचे दिसून आले. परिणामी महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरात चक्क बर्फाची चादर पाहायला मिळाली. परभणीतही तापमान घसरला आहे. परभणीत ७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. पुण्यातही शनिवारी सरासरी तापमान ५.१ अशं सेल्सिअस तर पाषाण भागातील ४.७ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, सातारा,सांगलीसारख्या ठिकाणी १० ते १२ अशं सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या थंडीमुळे जागोजागी शेकोटी जळताना दिसत आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0