राहुल गांधींनी उडवली सावरकरांची थट्टा

08 Feb 2019 12:01:58


 

 

नवी दिल्ली : येथील जवाहरलाल नेहरू मैदानात काँग्रेसच्या अल्पसंख्याक परिषदेमध्ये बोलताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वा. सावरकरांची थट्टा उडवली. राहुल यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. यामुळे राहुल यांच्याविरोधात देशभरात संतापाची मोठी लाट उसळली आहे. सावरकर यांचे देशासाठीचे योगदान तुम्ही कसे विसरलात? असा प्रश्नदेखील राहुल यांना विचारला जातोय. 


राहुल यांनी काँग्रेसला मते देणारे 'शेर के बच्चे' असा उल्लेख केला. तर भाजप व संघाचा 'डरपोक, कायर' असा उल्लेख केला. यासाठी त्यांनी स्वा. सावरकरांचे उदाहरण देत स्वा. सावरकरांनी इंग्रजांना घाबरून त्यांनी जे सांगितले, तसे माफीचे पत्र लिहिल्याची नक्कल करत यांचा डीएनए डरपोक असल्याचा उल्लेख राहुल यांनी केला. राहुल यांनी सावरकरांची नक्कल केल्याने व त्यांना डरपोक संबोधल्याने, देशभारत त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

 

दरम्यान, काँग्रेसच्या अल्पसंख्याक परिषदेमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपवर टीका केली. तसेच राहुल गांधी रा. स्व. संघावरदेखील घसरले. मोदी देश चालवत नसून सरसंघचालकच देश चालवत असल्याचे ते म्हणाले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0