छत्तीसगडमध्ये दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

07 Feb 2019 14:21:59



स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड्स यांची संयुक्त कामगिरी


बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर येथे सुरक्षा दलांनी १० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड्स यांच्या संयुक्त मोहिमेत ही सुरक्षा दलाने ही दमदार कामगिरी केली. कंठस्नान घातलेल्या या दहा नक्षलवाद्यांकडून व घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती येथील पोलीस अधीक्षक मोहित गर्ग यांनी दिली.

 

भैरमगढ येथील माढ जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण चालू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर सुरक्षा दल या नक्षलवाद्यांच्या मागावर होते. नक्षलवाद्यांना घेरून स्पेशल टास्क फोर्स आणि डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड्स यांनी या नक्षलवाद्यांचा खात्मा केला. दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते अशी माहिती सांगण्यात येत आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0