नीला विखे पाटील स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी

07 Feb 2019 10:45:47


 

मुंबई - स्वीडिश पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नीला विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या दिवंगत माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटलांची नात आहेत. नीला या शिक्षण तज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत. नीला यांचा जन्म स्विडनमध्ये झाला असून, त्यांचे प्राथमिक शिक्षण अहमदनगरमध्ये झाले.

 

निला स्विडनचे पंतप्रधान केजेल स्टीफन लोफ्वेन यांच्या सल्लागार म्हणून काम पाहणार आहेत. नीला पंतप्रधान कार्यालयातील आर्थिक, कर, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार आणि घर बांधणीचे काम पाहतील. त्या स्विडनच्या स्विडीश ग्रीन पक्षाच्या सदस्य आहेत. त्यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून पदवी व एमबीएचे शिक्षण घेतले आहे. त्यासोबतच माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांचे शिक्षण घेतले आहे. अशोक विखे पाटील हे विखे पाटील शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. या शिक्षण संस्थेकडून १०२ शैक्षणिक संस्था चालवल्या जातात.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

Powered By Sangraha 9.0