जामनेरात ५०० लाभार्थ्यांना उज्जवला गॅसजोडणी वाटप

04 Feb 2019 17:53:32
 
 
जामनेर, ४ फेब्रुवारी
शहरातील सुमारे पाचशेच्या वर लाभार्थ्यांना नगराध्यक्षा साधना महाजनांच्या हस्ते मोफत उज्वला गॅसजोडणीचे महात्मा ज्योतीबा फुले मंगलकार्यालयात आयोजीत कार्यक्रमात वाटप करण्यात आले.
 
 
यावेळी मंचावर जि.प. सभापती रजनी चव्हाण,शिक्षणसंस्थेचे सचिव जितु पाटील,प्रा .शरद पाटील,उपनगराध्यक्ष अनीस शेख,बाबुराव हिवराळे, शितल सोनवणे,मंगला माळी,खलील शेख,नाजीम शेख,रिजवान शेख,फारूख मन्यार,डॉ ईम्तीयाजखान, सुधाकर माळी,एल एच खान,उल्हास पाटील गटनेते डॉ.प्रशांत भोंडे,नुरूद्दीन शेख उपस्थित होते. प्रा .शरद पाटील यांनी प्रधानमंत्री उज्वला योजनेविषयी माहिती दिली.प्रास्तावीक सुशिलागॅस एजन्सीचे राहुल ललवाणी यांनी केले तर सुत्रसंचलन व आभार रवींद्र झाल्टे यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0