नाशिकपुत्र निनाद मांडवगणे हुतात्मा

    दिनांक  28-Feb-2019 


नाशिक : बुधवारी जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यामध्ये नाशिकचे पुत्र स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे यांना वीरमरण आले. ते ३३ वर्षांचे होते. त्यांची एक महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे बदली झाली होती. त्यानंतर ही दुःखद घटना घडली. त्यांच्या पच्छात त्यांची पत्नी, दोन वर्षाची मुलगी, लहान भाऊ आणि त्यांचे आई-वडील असे कुटुंब आहे.

 

निनाद यांचा जन्म १९८६ मध्ये झाला असून त्यांचे पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण भोसला मिलीटरी स्कूलमध्ये झाले. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी पूर्व संस्थेतून पूर्ण केले. ते २६ व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी होत. त्यांनी बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये झाली. हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर २४ डिसेंबर२००९ मध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले. २४ डिसेंबर २०१५ मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक होती.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat