वायुसेनेच्या कृतीतून पुलवामातील हुतात्म्यांना श्रद्धांजली - सरसंघचालक

    दिनांक  28-Feb-2019


 


नागपुर : वायुसेनेने प्रत्यक्ष कृतीतून पुलवामातील हुतात्मा जवानांना खरी श्रद्धांजली वाहिली आहे. सावरकरांचा विचार मानणाऱ्या लोकांचे सरकार आहे यामुळेच हे शक्य झाले. याच विचाराने देश पुढे कार्य करत राहिला तर सावरकरांच्या आत्मार्पणाचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल.असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले. नागपूर येथे झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर जीवनगौरव पुरस्कार प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना ते म्हणाले, “हिंदू समाज शक्तीसंपन्न राहिला पाहिजे. शक्तीशिवाय दिलेले वचन हे उपयोगाचे नाही. जगाला शक्तीचीच भाषा समजते, त्यामुळे शक्तीसंपन्न राष्ट्र हीच आमची कामना आहे. हा विचार समाजात रुजवण्याचे कार्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जीवनभर केले. दुर्दैवाने आपण त्यांचे विचार समजून घेतले नाहीत. भारताला जगातील शक्तिमान राष्ट्र करायचे असेल तर स्वा. सावरकरांचा संदेश कृतीत उतरवणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला संकल्प करावा लागेल

 

सावरकरांचे व्यक्तिमत्व बहुआयामी

 

स्वा. सावरकरांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या अलौकिक प्रतिभेचे वर्णन काही मिनिटात करणे अशक्य आहे. त्यांच्यातीन एकेका पैलूबाबत भाष्य करायचे तर अनेक दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करावी लागेल. दुर्दम्य आशावाद हे त्यांचे गुणवैशिष्ट्य होते. ते झुंजार होते. ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करताना पकडले गेल्यामुळे त्यांना अंदमानातील दोनदा काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली, तेव्हा पुढील पन्नास वर्षे ब्रिटिश शासन भारतात अस्तित्वात राहील का?’ अशी हसत हसत टिप्पणी भागवत यांनी यावेळी केली.

 

सावरकरांना काय मिळाले?

 

राष्ट्रासाठी आपले सारे जीवन राष्ट्रवेदीत स्वाहा करून स्वा. सावरकरांना काय मिळाले? स्वातंत्र्यानंतरही केवळ उपहास, निंदा, अपमान, खोटे आरोप हेच शासनाकडून मिळत राहिले. हे शिवशंकराने प्राशन केलेल्या विषासमानच होते. बालपणात देश-धर्मासाठी घेतलेली प्रतिज्ञा त्यांनी जीवनाच्या अखेरीपर्यंत पाळली. भव्य आणि उदात्त ध्येय समोर ठेवून त्या कठोर मार्गावर आपल्या व्यक्तिगत सुखाची आहुती देत जीवन व्यतित करणे असे त्यांनी केलेले कार्य हे साधारण नव्हते. असेही ते यावेळी म्हणाले.

 

माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat