मुंबई मेट्रोकडून रेड अलर्ट, प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन

28 Feb 2019 22:55:43

 

 
 
 
मुंबई : भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले ‘मिग २१’ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला असून यामध्ये मुंबईचाही समावेश आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई मेट्रो १ कडून सर्व १२ स्थानकांवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई मेट्रोकडून ही माहिती देण्यात आली असून सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
 

दिल्ली, मुंबईसह इतर पाच शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाब, राजस्थान आणि गुजरात या राज्यांमधील तीन शहरांनाही हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सैन्य दलाचे तळ, शस्त्रे यांवर विशेष नजर ठेवली जाते आहे. दहशतवादविरोधी कारवाईसाठी सज्ज असलेली पथकंही शहरांमध्ये तैनात करण्यात आली आहेत, अशीही माहिती समोर आली आहेमुंबईत प्रमुख ठिकाणी सुरक्षाव्यवस्थेसाठी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वेस्थानकावर सुरक्षा कडक करण्यात आली असून जीआरपी व आरपीएफ पोलिसांची गस्त रेल्वेस्थानकावर वाढविण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवाशांसह त्यांच्या सामानाचीही चौकशी करण्यात येत आहे.

 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0