विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे ३०व्या वर्षात पदार्पण

28 Feb 2019 17:17:35




ठाणे : येथील गतिमंद मुलांसाठी चालवले जाणारे विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट यंदा आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने विश्वास चॅरिटेबल ट्रस्टचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. २ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता ठाणे पश्चिमेला घंटाळी येथील सहयोग मंदिर येथील सभागृहात या स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

अश्विनी सुळे आणि ज्योस्त्ना प्रधान यांच्या संकल्पनेतून ३० वर्षांपूर्वी या ट्रस्टची सुरूवात करण्यात आली होती. विशेष मुलांच्या कलागुणांना योग्य तो वाव मिळावा आणि त्यांना सर्वसाधारण मुलांसारखेच आत्मविश्वासाने वावरता यावं हा यामागील उद्देश होता. सध्या विश्वासच्या कुटुंबात २५ मुले धडे गिरवत आहेत.

 

दरम्यान, यावेळी मुलांनी वर्षभर सादर केलेल्या नृत्यांचा आविष्कार होईल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट म्हणजे येथे सादर होणारे सर्व कार्यक्रम हे विशेष मूलं प्रस्तुत करणार आहेत. ज्यासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली असून त्यासाठी अनेक ठिकाणी प्रथम पारितोषिके पटकावली आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0