इनकम टॅक्स रिफंड
आयकर विभाग इनकम टॅक्स रिफंड सुरु करणार असून, पॅन कार्ड जोडणी केलेल्या बँक खातेदारकांच्या खात्यात हा इनकम टॅक्स रिफंड थेट जमा होऊ शकतो. यावर्षी १ मार्चपासून आयकर विभाग ई मोडमधून रिफंड देईल.
पीएनबी बँक
पीएनबी बँकेचे गृहकर्ज ०.१० टक्के कमी झाले आहे. यापूर्वी पीएनबी बँकेच्या गृहकर्जाचा व्याजदर ८.५५ टक्के होता, आता हा व्याजदर ८.४५ टक्के झाला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
येत्या १ मार्चपासून तुम्हाला इलेक्टोरल बाँड खरेदी करता येतील. इलेक्टोरल बाँड अर्थात निवडणुकीचे बाँड. हे बाँड स्टेट बँक ऑफ इंडियाच्या २९ शाखांमध्ये १ मार्चपासून उपलब्ध होऊ शकतात.
इलाहाबाद बँक
इलाहाबाद बँकेनेदेखील आपले गृहकर्ज स्वस्त केले असून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. इलाहाबाद बँकेचे गृहकर्ज ०.१० टक्केने कमी झाले असून आता या बँकेचे नवे व्याजदर ८.१५, ८.२५, ८.४५, ८.५०, ८.६५ आणि ८.९५ टक्के आहेत.
आता एलआयसीही होणार डिजिटल!
सध्या डिजिटलायझेशनचे युग आहे. हे लक्षात घेऊन भारतीय जीवन बीमा निगम (LIC) आता डिजिटल होत आहे. १ मार्चपासून एलआयसीच्या पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीविषयीची सगळी माहिती एसएमएसवर उपलब्ध होणार आहे.
यूजीसी नेट परीक्षेची रजिस्ट्रेशन प्रक्रिया १ मार्च रोजी होणार आहे. यूजीसी नेटची परीक्षा येत्या २०, २१, २४, २५, २६ आणि २८ या तारखांना जून महिन्यात होणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat