बालकोट मुख्यालयात होते ३२५ दहशतवादी

26 Feb 2019 16:18:52


 

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने पीओकेनजीकच्या जैशचे सर्व आतंकवादी तळ सुरक्षित ठेवण्यासाठी बालकोट येथील जैश-ए-मोहम्मद येथील मुख्यालयात ३५० आतंकवाद्यांना हलवले होते. भारतीय सैन्य इतक्या आत येऊन कारवाई करणार नाही, असा विश्वास पाकिस्तानला होता. मात्र, भारतीय वायुदलाच्या मिराज विमानांनी पीओकेमध्ये घूसत पाच बॉम्बस्फोट करत बालाकोट कॅम्प उध्वस्त केले.

 

या हल्ल्यामुळे त्रेताधारपीठ उडालेल्या पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी सेनेला सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी पाकिस्तानने भारताकडे दहशतवाद मिटवण्यासाठी आणखी एक संधी द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, भारताने चोख कारवाई केल्याने पाकिस्तानला घाम फुटला आहे.

 

 
 

या संबंधित अधिकृत आणि खात्रीशीर माहिती उघड होत आहे. जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मोठा भाऊ इब्राहिम अजहर कारवाईत मारला गेला. मसूद अजहरचा मेहुणा युसूफ अजहर हा देखील या कारवाईत मारला गेला. एकूण २५ ते ३० कॅम्पमध्ये एकूण ३२५ दहशतवादी साखर झोपेत होते. भारतीय वायु सेनेने त्यांना कंठस्नान घातले. अचानक झालेल्या या हल्ल्याचा पाकिस्तानी सैन्यही प्रतिक्रार करू शकले नाही. भारतीय वायूसेनेच्या ताकदीपुढे पाकिस्तानी विमानांनी पळ काढल्याची माहिती हवाई दलाच्या सुत्रांनी दिली. दरम्यान दहशतवाद्यांच्या कॅम्पकडे कुणालाही जाऊ दिले जात नसल्याचे पाकिस्तानी स्थानिकांचे म्हणणे आहे.

 

एक होते बालकोट

बालकोटचे जैशचे मुख्यालय हे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी महत्वाचे मानले जाते. या ठिकाणी पंचतारांकित हॉटेल्ससारख्या सुविधा उपलब्ध होत्या. एकूण पाचशे ते सातशे लोकांच्या राहण्याची सोय इथे होऊ शकत होती. कारवाईनंतर आता या ठिकाणचा दहशतवाद्यांचा महल कब्रस्तान बनला आहे.

 

 
 
 

ऑस्ट्रेलियाचा पाठींबा

ऑस्ट्रेलियाने भारताला या कारवाईसाठी पाठींबा दिला आहे. दहशतवादाचा समुळ नाश करण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे ऑस्ट्रेलियाने सांगत भारताला समर्थन दिले आहेत.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0