HOW’s THE JOSH…? HIGH SIR !

26 Feb 2019 11:25:19
 
 

नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेने पाकिस्तानवर मंगळवारी मध्यरात्री एअर स्ट्राईक करण्यात आला. या हल्ल्यात तब्बल हजार किलो स्फोटकांचा मारा करण्यात आला आहे. या हल्ल्यात तब्बल तिनशे दहशवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

 
 
 

भारताच्या या हवाई हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन भारतीय सैन्याचे आभार मानण्यात येत आहेत. तसेच #josh, #Air strike, #indianairforce #balakot #surgicalstrike2 हे हॅशटॅग ट्रेंड वर आहेत. पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे.

 
 
 

पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानी सैन्यदल प्रमुखांनी यानंतर बैठक बोलावली आहे. सध्या, सोशल मीडियावर पाकिस्तानला लक्ष्य करत भारतीय नेटीझन्सनी हवाई दलाचे अभिनंदन केले आहे.

 
 
 
 
 
 तुम्ही दहशतवादी कारवाया करून स्वतःला सर्वशक्तीशाली समजत असाल तर आम्ही तुमचे बाप आहोत, असे ट्विट कुट्टी या ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. 
 
 
 
 
 
. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतूक केले जात आहे. पंतप्रधानांनी तिनही दलांना जवाबी हल्ला करण्याचे पूर्णतः स्वातंत्र्य दिले होते. 
 
 
 
 
 
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
 
 
Powered By Sangraha 9.0