दहशतवाद्यांचं बारावं : वायुसेनेने असा घेतला बदला

26 Feb 2019 11:51:25


नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमधल्या दहशतवादी तळावर हल्ले करण्यात आल्याचा दुजोरा परराष्ट्र मंत्रालयांच्या सचिवांनी दिला आहे. मंगळवारी मध्यरात्री १२ मिराज विमानांनी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत. मौलाना युसुफ अजहर हा दहशतवाद्यांचा मोठा तळ चालवत होता आणि पुढे आणखी हल्ला करण्याची तयारी हे दहशतवादी करत होते.

 
 
 

भारतीय वायुदलाने पाकिस्तानातील सामान्य नागरिकांना कोणतेही नुकसान पोहोचवले नसल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली. पाकिस्तानच्या जमिनीचा वापर दहशतवादासाठी वारंवार असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची पुष्टी त्यांनी केली. बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या तळांना उद्धवस्त करण्यात भारतीय वायुसेनेला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

 

जैशचा कमांडर मौलाना युसुफ अजहर हा देखील या ठिकाणी दहशतवाद्यांचे प्रशिक्षण देत होता. मात्र, त्याचा खात्मा झाल्याची अधिकृत माहिती अद्याप आलेली नाही. याबद्दल आणखी माहिती वेळीच देऊ असे गोखले यांनी सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0