नीरव मोदीची १४८ कोटींची संपत्ती जप्त

26 Feb 2019 18:23:06


 


मुंबई : पीएनबी घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी नीरव मोदीची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) १४७.७२ कोटीची संपत्ती जप्त केली आहे. मोदी हा १३ हजार ७०० कोटी रुपयांच्या पीएनबी घोटाळ्याचा मुख्य आरोपी असून मुंबई आणि सुरत येथील त्याच्या संपत्ती ईडीने जप्त केल्या आहेत. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये ८ कार, एक प्लॉट, मशीनरी, दागिने, पेंटिंग तसेच इतर स्थिर मालमत्तेचा समावेश आहे.

 

पीएनबी घोटाळ्याचा तापास ईडी करत असल्याने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याअंतर्गत ईडीने ही कारवाई केली. यापूर्वीदेखील हॉंगकॉंग येथील २५५ कोटींची संपत्ती व त्याच्या नातेवाईकांची ६३७ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. नीरव मोदी हा सध्या लंडन येथे लपून बसला असून भारत सरकार त्याच्या प्रत्यारोपणासाठी प्रयत्न करत आहे.

 

माहितीच्यामहापुरातरोजच्यारोजनेमकामजकूरमिळविण्यासाठीलाईककरा...facebook.com/MahaMTB/आणिफॉलो कराtwitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0