चोर तो चोर वर... 'पाक'ड्यांच्या पुन्हा उलट्या बोंबा

22 Feb 2019 16:47:55


 

 

'पाक'ड्यांच्या पुन्हा उलट्या बोंबा


नवी दिल्ली : भारत पाकिस्तानची चारही बाजूने कोंडी करत असताना 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी हालत झाली आहे. अशा अवस्तेत पाकिस्तानकडून भारतावर बिनबुडाचे आरोप मात्र काही केल्या थांबत नाही आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पत्रकार परिषद घेऊन खोटे दावे केल्यानंतर शुक्रवारी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिफ गफूर यांनी पत्रकारपरिषदेमध्ये पुन्हा खोट्या दाव्यांची सरबत्ती चालू ठेवली. यामध्ये त्यांच्याकडून पुन्हा 'आमचा पुलवामा हल्ल्यामध्ये काही संबंध नव्हता' असेच सांगण्यात आले.

 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्यांनी प्रथमच एक पत्रकार परिषद आयोजित केली. पाकिस्तानने भारतावरच दहशतवादाचे आरोप करत सांगितले की, १९४७पासून भारतात काश्मीरवासीयांवर अत्याचार होत आहेत. "भारतात काहीही झाले की लगेच पाकिस्तानवर आरोप लावले जातात. आम्ही यावेळेस आम्ही उत्तर देण्यास वेळ घेतला कारण आमच्यावर लावलेल्या आरोपांची पडताळणी केली. यामध्ये भारताकडे पुरावे नसताना आमच्यावर आरोप करत आहेत." असे हास्यास्पद दावे लष्करप्रमुख असिफ गफूर यांनी केले.

 

"पुलवामा हल्याबाबत भारताकडून आरोप करण्यात येत आहेत पण निवडणूकांच्या तोंडावर भारतात हल्ले वाढतात. यामध्ये पाकिस्तानचा संबंध नाही." असे पाकिस्तानच्या गफूर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात लढत असतो पण भारतातर्फे त्याला नेहमी विरोध करतो. पाकिस्तानला नेहमी शांतताच हवी आहे. विचार न करता भारताकडून आमच्यावर आरोप होत असल्याचे सांगण्यात आले.

 

"पाकिस्तान दहशतवादावरही बोलायला तयार आहे. मात्र तो प्रस्ताव भारत स्वीकारत नाही. पाकिस्तानकडून काही चुकाही झाल्या आहेत. पण आता चुकांना जागा नाही. आम्ही युद्धाची तयारी करत नाही आहोत तर युद्ध लादले तर त्याला प्रतिकार करण्याची क्षमता आमच्यात आहे. भारतानेच आम्हाला धमकी दिली आहे. हा पाकिस्तान नवा आहे. आम्हाला युद्ध नको आहे. पण आम्ही कमजोर नाही आम्ही पूर्ण ताकदीने प्रतिकार करू. आम्ही चर्चेचा प्रस्ताव देतोय, आम्ही मिळून चौकशी करण्याचाही प्रस्ताव देतो आहे. आम्ही पुढे जायचं आहे. नवी पीठी घडवायची आहे. आम्हाला युद्ध नको." अशा वायफळ बाता लष्करप्रमुखांनी केल्या.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0