बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश!

21 Feb 2019 11:02:51

 

 
 
 
पुणे : पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये रवी पंडित मिल हा ६ वर्षांचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. तब्बल १७ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर रवीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. एनडीआरएफची टीम आणि इतर यंत्रणांनी मिळून यासाठी प्रयत्न केले. बुधवारी संध्याकाळी ४:३० च्या सुमारास रवी बोअरवेलमध्ये पडला होता. ही बोअरवेल २०० फूट खोल आहे.
 
रवी या बोअरवेलमध्ये १० फूट खोल अंतरावर अडकला होता. पोलीस आणि एनडीआरएफची टीम मिळून रवीच्या सुटकेसाठी प्रयत्न करत होती. १७ तासांनंतर गुरुवारी सकाळी रवीला बोअरवेलमधून सुखरुप बाहेर काढण्यात आले. यासाठी स्थानिकांच्या मदतीने या बोअरवेलच्या बाजूने खोदकाम करण्यात आले.
 

रवी पंडित मिल हा मूळचा शेगाव पाथर्डी येथील रहिवासी आहे. रवीचे आई आणि वडील रस्त्याच्या कामात दगड फोडण्याचे बिगारी काम करतात. थोरांदळे जाधववाडी येथे रस्त्याचे काम करत असताना रवी तेथे जवळच्या परिसरात खेळत होता. खेळताना रवी बोअरवेलमध्ये पडला. रवीच्या आईवडीलांनी तातडीने गावकऱ्यांकडे मदत मागितली. त्यानंतर रवीला बोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु करण्यात आले. तब्बल १७ तासांनंतर या बचावकार्याला यश आले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0