विठ्ठल रुक्मिणी मंदिराची शहीद कुटुंबियांना मदत!

    दिनांक  19-Feb-2019राज्यातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये देणार

 

पंढरपूर : पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना देशभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. देशभरातील संकटावेळी धावून जाणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी मंदिरदेखील यात मागे नाही. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने राज्यातील शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपये मदत जाहीर केली आहे. याबाततची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांनी दिली.

 

पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला सीआरपीएफ जवानाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. यात ४० जवान शहीद झाले होते. यामध्ये राज्यातील दोन जवानांचा समावेश होता. नितीन राठोड आणि संजयसिंह राजपूत यांच्या कुटुंबियांच्या दुःखात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी व महाराष्ट्रातील तमाम विठ्ठलभक्त वारकरी सहभागी आहेत. या शहीद जवानाच्या कुटुंबियाना प्रत्येकी १० लाख असे एकूण २० लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या मार्गदर्शानुसार हा निधी शहीदांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला जाणार असल्याची माहिती डॉ. भोसले यांनी दिली.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat