पाकिस्तानी गायकाला सलमानने हाकलले!

19 Feb 2019 11:39:41

 

 
 
 
मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्पलॉईज (FWICE) या सिनेकामगार संघटनेने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. या दृष्टीने एक पाऊल पुढे उचलत अभिनेता सलमान खानने आपल्या होम प्रोडक्शनचा आगामी सिनेमा ‘नोटबुक’मधून पाकिस्तानी गायक आतिफ असलमचे गाणे काढून टाकले आहे.
 

आतिफ असलमने ‘नोटबुक’ या सिनेमात गायलेले गाणे आता दुसरा गायक गाणार आहे. दोन दिवसात गाण्याचे पुन्हा नव्याने रेकॉर्डिंग करण्यात येईल. अशी माहिती मिळाली आहे. नितीन कक्कर यांनी ‘नोटबुक’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. नवोदित अभिनेत्री प्रनूतन बहल या सिनेमातून पदार्पण करत आहे. बॉलवुडमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री नूतनची प्रनूतन ही नात आहे. अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांकडून सलमानचे कौतुक होत आहे. 

 

FWICE ने पाकिस्तानी कलाकारांवर तर बंदी घातली आहेच. पण यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्या सिनेनिर्मात्यांवरही बंदी घालण्यात येईल. असा निर्णय FWICE या सिनेकामगार संघटनेने घेतला आहे. सोमवारी याप्रकरणी FWICE कडून नोटीस काढण्यात आली. देशावर दहशतवादी हल्ले होत असूनही पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणाऱ्या म्युझिक कंपन्यांना लाज वाटायला हवी. त्यांना जर लाज वाटत नसेल तर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करण्यापासून आम्ही त्यांना रोखू.” असे FWICE या सिनेकामगार संघटनेचे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी म्हटले आहे. 

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0