शहिदांसाठी 'टोटल धमाल'च्या टीमने घेतला 'हा' निर्णय

18 Feb 2019 14:59:11

 

 
 
  
मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी बॉलिवुडमधून अनेक हात पुढे आले आहेत. अमिताभ बच्चन, सलमान खान, अक्षय कुमारनंतर आता 'टोटल धमाल' या सिनेमाची टीमही मदतीसाठी पुढे सरसावली आहे. या सिनेमातील कलाकारांसह टीममधील छोटे-मोठे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मिळून ५० लाख रुपयांचा मदतनिधी जमा केला आहे. हा मदतनिधी शहिदांच्या कुटुंबियांना दिला जाणार आहे. तसेच ‘टोटल धमाल’ हा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिनेमाच्या निर्मात्यांनी घेतला आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 

शहिदांच्या कुटुंबियांसाठी बॉलिवुडने दिला मदतीचा हात

 

‘उरी : द सर्जिकल स्ट्राईकया सिनेमाच्या टीमनेही शहिदांच्या कुटुंबियांसाठी १ कोटी रुपयांचा निधी जमा केला. अभिनेता अक्षय कुमारने ७ कोटी रुपयांचा मदतनिधी भारत के वीर या अॅपद्वारे अवघ्या दीड दिवसात जमा केला. तसेच अक्षय कुमारने स्वत:कडून या निधीमध्ये ५ कोटी रुपयांची मदत केली. अभिनेता अमिताभ बच्चन यांनी शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केले.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
 
Powered By Sangraha 9.0