आज युतीची अधिकृत घोषणा होणार

18 Feb 2019 14:04:31

 

 
 
 
 

खा. संजय राऊत यांची माहिती

 

मुंबई : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह हे आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेते संयुक्तरित्या युतीची अधिकृत घोषणा करतील, अशी माहिती, खा. संजय राऊत यांनी दिली. लोकसभा निवडणुकीसाठी २५-२३ चा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली. तर विधानसभेसाठीही ५०-५० चा फॉर्म्युला ठरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आज दोन्ही नेते युतीची अधिकृत घोषणा करणार असल्याने युतीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. 

 

खा. अमित शाह हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह युतीच्या चर्चेसाठी मातोश्रीवर येणार असल्याचे राऊत म्हणाले. तसेच युतीच्या फॉर्म्युलांबद्दल जी काही माहिती असेल ते हे नेते सर्वांना देऊन याबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे त्यांनी नमूद केले. युती व्हावी यासाठी भाजपने मित्रपक्षाने शिवसेनेसाठी पालघरची जागा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. तसेच विधानसभेसाठीही ५०-५० जागा लढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0