बलुचिस्तानचा पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला

18 Feb 2019 11:03:15

 

 
 
 
इस्लामाबाद : पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला बलुचिस्तानकडून करण्यात आला असून यात पाकिस्तानी सैन्याचे ९ जण ठार झाले असून ११ जण जखमी आहेत. द बलुचिस्तान पोस्टने या घटनेचे वृत्त दिले आहे. बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअर असलेल्या भागात हा हल्ला झाला. तुरबत आणि पंजगुर यादरम्यान पाकिस्तान सैन्यावर बलुचिस्तानकडून हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
 
सौदी अरेबियाचे राजे मोहम्मद बिन सलमान पाकिस्तानमध्ये जाणार होते. त्यांच्या पोहोचण्याआधी काही तासांपूर्वीच हा हल्ला करण्यात आला. बलुच लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट आणि बलुच रिपब्लिक गार्ड या तीन संघटनांचा बलुच राजी अजोई संगरमध्ये समावेश होतो. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी या संघटना करत आहेत. पकिस्तानी सैन्याच्या गस्ती पथकावर आणि त्यांच्या तळावर बलुचिस्तानकडून एकाचवेळी हल्ला करण्यात आला. अशी माहिती बलोच खान यांनी दिली. बलोच खान हे बलुच राजी अजोई संगर या संघटनेचे प्रवक्ते आहेत.
 
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/आणिtwitter.com/MTarunBharat

 
Powered By Sangraha 9.0