आम्हाला पराक्रमाची भूक आहे...!!!

    दिनांक  16-Feb-2019   

 


 
 
 
चप्पा चप्पा खंडहर हो,

गली गली शमशान हो,

इतना बारुद उडा डालो,

पूरा पाक कब्रिस्तान लगे।

 

या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या सामान्य माणसाच्या आहेत. तसा भारतीय माणूस वृत्तीने हिंसक नसतो. तो मुंगीलादेखील मारताना दहा वेळा विचार करील. परंतु, तोच जेव्हा सहनशीलतेच्या कडेलोटाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा त्याचे तेज प्रकट होते. शंकराचा तिसरा नेत्र उघडला जातो. ती वेळ आता आलेली आहे. जनभावनांची दखल शासनाने घेतली पाहिजे. शांतीचे पाठ घरी ठेवले पाहिजेत. आता प्रवचन करायचेच झाले तर ते क्षात्रशक्तीचे करायला पाहिजे.

 

साऱ्या देशाची आज एकच मागणी आहे, पुलवामा हल्ल्याचा सूड घ्या. प्रत्येक देशवासियाच्या मनात सुडाच्या अग्नीची होळी पेटलेली आहे. म्हणून तो म्हणतो की,

 

हो जाने दो-दो हाथ

कायरों की जमात से,

शांति का बहुत हुआ पाठ,

अब तो खून की होली चाहिए।

 

होळी पुढच्या महिन्यात आहे. ती तिथीप्रमाणे येईल, प्रश्न असा आहे की, पाकिस्तानची होळी कधी होणार? ती करण्याची हिंमत शासन दाखवणार आहे काखूप झाले आता शहीद जवानांची संख्या मोजण्याचे दिवस, आता आम्ही त्या दिवसाची वाट बघत आहोत, जो दिवस शत्रूची प्रेते मोजण्याचा दिवस असेल. साऱ्या देशाला आज पराक्रमाची भूक आहे. आम्हा सर्वांना पराक्रम पाहिजे आहे. त्याची जी पडेल ती किंमत द्यायला आम्ही सर्व तयार आहोत. किती काळ दहशतवाद्यांच्या भितीच्या छायेत जगायचे? त्यालाही मर्यादा आहेत. सोशल मीडियावर एकजण म्हणून गेला,

 

कैसे सोऊँ सुकून की नींद मैं साहब...

सुकून से सुलानेवालों के तो

शव आ रहे है!

 

आता हे थांबवा, क्षणापुरते नाही तर कायमचे थांबवा. हा आंतक भारत दहाव्या-अकराव्या शतकापासून झेलत आहे. कधी अरब आले, कधी तुर्क आले, कधी इराणी आले, कधी मोगल आले तर कधी अफगाणी आले. मंदिरांचा विध्वंस, नद्या लाल होतील एवढा रक्तपात, मणाने मोजता येतील एवढी- ब्राह्मणांची कापलेली डोकी अन् जानवे, लाखो स्त्रियांचे अपहरण, लाखो मुलांचे अपहरण, आणि एक कोटीहून अधिक हिंदुंची कत्तल, इतिहासात झालेला हा महाभयानक नरसंहार आहेभारतीय संस्कृतीविषयी बोलताना नोबेल पारितोषिक विजेते नायपॉल म्हणाले, “अत्यंत भयानक गोष्ट घडलेली आहे. मला असे वाटते की, या आक्रमणांनी भारतीय संस्कृती प्राणघातकरित्या जखमी झालेली आहे.” नायपॉल सत्य बोलले म्हणून तेव्हा असत्यवादी डावे भणंग त्यांच्यावर खवळले होते. जागतिक इतिहासकार विल डुरान्ट आपल्याला सांगतात, “भारतातील इस्लामिक विजय हा निश्चितपणे इतिहासातील रक्तरंजित कथा आहे.” विल डुरान्ट यांच्यावर लाथा मारण्याचे धाडस डाव्या भणंगाना नाही. या आक्रमकांनी बुद्धांच्या मूर्ती फोडल्या. बाबासाहेब सांगतात, “बुत हा अरबी शब्द आहे, त्यापासून बुतशिकन हा शब्द तयार झाला. त्याचा अर्थ होतो मूर्ती फोडणारे. इस्लामी आक्रमकांनी भारतातून बुद्धीझम नाहीसा करण्यात हातभार लावला.” जर्मन इतिहासकार विल्यम पोचहमर म्हणतो, “अमर्याद रक्तस्नान आणि तेवढेच क्रौर्य यांचा वापर करुन अमाप कत्तली झाल्या. स्त्रिया आणि मुलींना जनानखान्यात कोंबण्यात आले. मुलांना गुलाम करुन विकण्यात आले.”

 

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे क्रौर्य थांबेल असे वाटले होते, पण पाकिस्तान आपल्याला शांतपणे जगू देत नाही. दहशतवाद हे शस्त्र म्हणून पाकिस्तानने वापरायला सुरुवात केली. १९९० सालापासून दहशतवादी हल्ले असे – १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटात सुमारे २५७ नागरिक ठार झाले. १९९३ साली संघाच्या मद्रास कार्यालयात बॉम्बस्फोट झाला, त्यात अकरा लोक ठार झाले, १९९८ साली कोइम्बतूरला बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले, त्यात ९८ लोक ठार झाले, २००१ साली जम्मू-काश्मीर परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात ३८ लोक ठार झाले, २००२ साली जम्मूच्या रघुनाथ मंदिरात अकरा लोकांना बॉम्बस्फोटाने उडविण्यात आले, त्याचवर्षी अक्षरधाम येथे बॉम्बस्फोट झाला, त्यात ३१ जण ठार झाले, २००५ साली दिल्लीत साखळी बॉम्बस्फोट झाले, त्यात ७० लोक मेले, २००६ साली मुंबईच्या रेल्वेत बॉम्बस्फोट झाले, त्यात २०९ लोकांना प्राण गमवावे लागले, २६ नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्यात १७१ जण प्राणास मुकले, २०१६ साली पठाणकोट, उरी येथे बॉम्बस्फोट झाले, त्यात २७ जण गेले आणि पुलवामाच्या बॉम्बस्फोटात ४२ जणांना प्राण गमवावे लागलेहे क्रौर्य आपण किती काळ सहन करायचे? का करायचे? एकदाच त्याचा सोक्षमोक्ष का लावायचा नाही? भितीने जगणारा माणूस रोज मरत असतो आणि शौर्याने मरणारा माणूस एकदाच मरतो. हे रोजचे मरणे कशासाठी?

 

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांपासून ते प्रादेशिक नेत्यांपर्यंत सर्वांनी आपल्या भावना प्रकट केलेल्या आहेत. पगडी आणि पागोट्याचे राजकारण करणारे काय बोलतात, हे आपण विसरुन जाऊया. परंतु, रोज भाजपवर टीकेची धाड धरणारे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधीदेखील थोड्या वेगळ्या भाषेत जेव्हा बोलतात तेव्हा देशाचे मानस काय आहे, हे शासनाने समजून घ्यायला पाहिजे. पाकिस्तानबरोबरच्या युद्धाची भिती मनातून काढून टाकली पाहिजे. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहेत, मग भारताकडे दिवाळीतील फटाक्यातील बॉम्ब आहेत का? अणुबॉम्बची भिती बाळगण्याचे कारण नाही. संहाराला भिण्याचे तर अजिबात कारण नाही. स्थिती, उत्पत्ती आणि संहार हा सृष्टीचा नियम आहे. तो विज्ञानसिद्ध आहे. युद्धात किती माणसे मरतील, कशी मरतील, याची चित्रे अनेक लोक रंगवितात. आज पुलवामाचा निषेध करणारे तथाकथित कॅण्डलवाले उद्या भारतीय सैन्याने कारवाई सुरु केल्यानंतर शांतीचे कॅण्डल मार्च काढणार नाहीत, असे समजू नयेत. असा डरपोक औलादीचा विचार करता कामा नये.

 

अनेक वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीर सीमेवर संघाचे ज्येष्ठ प्रचारक गेले होते. रोज सीमेपलीकडून गोळीबाराच्या घटना तिथे घडत होत्या. एक आजी त्या प्रचारकाला म्हणाली, “बेटा, पाकिस्तान का नामोनिशान मिटा दो, अब बहुत हो गया।” प्रचारक म्हणाले, “माँ, लडाई होगी तो अणुबॉम्ब भी गिरेंगे, उसमें बहुत लोग मरेंगे.” ती वृद्धा म्हणते, “किती लोक मरतील?” प्रचारक म्हणतो, “संख्या खूप मोठी असेल.” ती वृद्धा म्हणते, “एक कोटी लोक मरतील असे आपण समजू, लेकिन एक साल भरमें एक करोड बच्चे पैदा होते है।सामान्य माणूस लढायला आणि मृत्यूलादेखील घाबरत नाही. मरायचे तर आहे कधी तरी मग त्याला घाबरुन कसे चालेल, असा तो साधा सोपा विचार करतो. दुर्दैवाने भारतीय राजकीय नेतृत्त्वाची परंपरा सामान्य माणसाच्या शौर्याची, मृत्यूंजय वृत्तीची कदर करणारी नाही. १९६५ सालचे युद्ध आपण जिंकले, आपलीच भूमी परत मिळविली आणि ताश्कंदच्या तहात ती घालवून टाकली. १९७१ च्या युद्धात नव्वद हजार पाकचे सैनिक आपल्या ताब्यात होते. पाककडे असलेली आपली मोठी भूमी आपल्या हातात होती. इंदिरा गांधींनी सिमला करारात सर्व घालवून टाकले. जवान आणि जनतेच्या शौर्यावर माती फिरविली. कारगीलमध्ये पाकिस्तानने आक्रमण केले, ते युद्ध आपण जिंकले. पण आपल्याच घरात हुतूतू खेळून. पाकिस्तानमध्ये घुसण्याची ती संधी होती, तिचा उपयोग आपण केला नाही.

 

इतिहासात याच चुका पृथ्वीराज चौहानाने केल्या. महम्मद घोरी जीवंत हाती सापडला असताना त्याला ठार करण्याऐवजी सोडून दिले. अफजल खान विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही, हे माहीत असतानाही शहाजी राजांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि नंतर कैद झाले. हैदर आणि टिपू विश्वास ठेवण्याच्या कवडीचेही लायकीचे नसताना मराठाशाहीने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचे राज्य जीवंत ठेवले. छत्रपती शिवाजी महाराज एक असे निघाले, ज्यांनी विश्वासघाती अफजल खानाचे पोट फाडले. बहलोलखान पठाण जिवंत हातात सापडला असताना त्याला प्रतापराव गुजर यांनी सोडून दिले. महाराज खवळले आणि त्यांनी आपल्या सरसेनापतीची कानउघाडणी केली. पाकिस्तान ही या सर्वांची औलाद आहे. अविश्वास मानवी रुप घेऊन आला तर तो कसा दिसेल तर पाकिस्तानसारखा. त्याच्या शरीरावर शेकडो जखमा केल्या पाहिजेत. त्या कशा असल्या पाहिजेत?

 

चप्पा चप्पा खंडहर हो,

गली गली शमशान हो,

इतना बारुद उडा डालो,

पूरा पाक कब्रिस्तान लगे।

 

या सर्व भावना सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या सामान्य माणसाच्या आहेत. तसा भारतीय माणूस वृत्तीने हिंसक नसतो. तो मुंगीलादेखील मारताना दहा वेळा विचार करील. परंतु, तोच जेव्हा सहनशीलतेच्या कडेलोटाच्या टोकाला पोहोचतो तेव्हा त्याचे तेज प्रकट होते. शंकराचा तिसरा नेत्र उघडला जातो. ती वेळ आता आलेली आहे. जनभावनांची दखल शासनाने घेतली पाहिजे. शांतीचे पाठ घरी ठेवले पाहिजेत. आता प्रवचन करायचेच झाले तर ते क्षात्रशक्तीचे करायला पाहिजेभारताची भूक पराक्रमाची आहे. पोटाची भूक भात-चपातीने भागते. मनाची भूक वेगळ्या भावनांच्या पूर्तीने भागते. बुद्धीची भूक चांगली पुस्तके वाचून भागते. आजची भूक ही शरीराची भूक नाही, तर शतकानुतके दाबल्या गेलेल्या आंतरात्म्याची भूक आहे. ही पराक्रमाची भूक आहे. भारतीय माणसाला पुन्हा एकदा भारतमातेला नरमुंडाची माळ गळ्यात घातलेल्या हातात रक्ताची कटोरी घेतलेल्या कालिमातेच्या रुपात पाहण्याची आस लागलेली आहे. ती पूर्ण व्हावी, हीच अपेक्षा!